बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या आगामी ‘एक पहेली लीला’ चित्रपटातील ‘तेरे बिन नही लागे’ हे गाणे नुकतेच युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले. सनी लिओनीच्या मादक आणि बिनधास्त अदांमुळे सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळेच हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच सनी लिओनीला पाहण्यासाठी युट्यूबवर चाहत्यांच्या उड्या पडल्या. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यानंतर आलेल्या ‘देसी लूक’ गाण्यानंतर आता ‘तेरे बिन नही लागे’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे या गाण्यातही सनी बोल्ड अवतारात दिसत आहे. सनीच्या हॉट लूकमुळे या गाण्याला आतापर्यंत यूट्यूबवर तब्बल १ लाख ८८ हजार हिट्स मिळाले आहेत.
‘एक पहेली लीला’ हा सिनेमा पुनर्जन्मावर आधारित असल्याचे असे बोलले जात आहे. तर, लीला एक पहेलीचे दिग्दर्शक बॉबी खान यांनादेखील सनीच्या बोल्ड सीन्समुळे हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. चित्रपटात सनी लिऑनीसह जय भानुशाली, रजनीश दुग्गल आणि राहुल देव हे मुख्य भुमिकेत आहेत. या सिनेमात ऐश्वर्या-सलमान यांच्या हिट झालेल्या ‘ढोली तारो’ या गाण्यावर सनी थिरकताना दिसेल. सनीच्या या सिनेमातील एक डायलॉगमध्ये म्हणते की, ‘सक्सेस का शॉर्ट कट है शॉर्ट स्कर्ट’. ‘एक पहेली लीला’ येत्या 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader