बॉलीवूडचा दंबग खान सलमानच्या आगामी बजरंगी भाईजान चित्रपटातील सेल्फी लेले रे.. हे पहिले गाणे प्रदर्शित झाले असून यूट्युबवर गाण्याला चांगली पसंती देखील मिळत आहे. तरुणाईमध्ये असलेल्या सेल्फीची क्रेझ लक्षात घेऊन गाण्याचे बोल लिहीण्यात आले आहेत. सेल्फी लेले रे म्हणत गुलालाची उधळण करत सलमान रस्त्यावर आपल्या मनमोकळ्या नृत्यशैलीत थिरकताना दिसतो. हनुमानाची वेशभुषा परिधान केलेली बच्चेमंडळी देखील गाण्यात सलमानसोबत सेल्फी टीपताना दिसतात. सलमानच्या इतर गाण्यांप्रमाणेच याही गाण्यात संपूर्ण नृत्यात एखादी लक्षवेधी डान्सिंग स्टेपचा तडाका देण्यात आला आहे. संगीतकार प्रीतम यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून गायक विशाल दादलानी याने गायले आहे.
आणखी वाचा