‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘मुन्नी’ची भूमिका साकारलेल्या सहा वर्षांच्या हर्षाली मल्होत्राने पडद्यामागे केलल्या मौजमस्तीचा व्हिडिओ ‘सलमान खान फिल्म’ने शेअर केला आहे. चित्रपटात मूकअभिनय करणारी हर्षाली प्रत्यक्षात मात्र भरपूर बोलकी असल्याचे चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान सांगतो. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक कबीर खानसोबत जमलेली गट्टी आणि त्यातून घडलेले काही मजेशीर प्रसंग व्हिडिओमध्ये आहेत. सेटवर सर्वजण हर्षालीचे भरपूर लाड करीत असत. सलमान खानसोबत काम करत असल्याचे समजल्यानंतर हर्षाली दोन दिवस आनंदाने नाचत होती, असेही कबीर खानने सांगितले. चित्रपटातील एका अॅक्शन सीनचे चित्रकरण सुरू असताना हळव्या मनाच्या हर्षाली रडू कोसळ्याचाही प्रसंग व्हिडिओमध्ये आहे.
पाहा ‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ची पडद्यामागची धम्माल
'बजरंगी भाईजान' चित्रपटातील 'मुन्नी'ची भूमिका साकारलेल्या सहा वर्षांच्या हर्षाली मल्होत्राने पडद्यामागे केलल्या मौजमस्तीचा व्हिडिओ 'सलमान खान फिल्म'ने शेअर केला आहे.
First published on: 28-07-2015 at 10:09 IST
TOPICSबजरंगी भाईजान
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch behind the scenes of bajrangi bhaijaan harshaali malhotra with kabir and salman uncle