‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘हिरोईन’ यांसारख्या वास्तववादी चित्रपटांचा दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या आगामी ‘कलेंडर गर्ल्स’ या चित्रपटाचा टिझर गुरूवारी प्रदर्शित झाला. बॉलीवूडमध्ये मधुर भांडारकर रिअलॅस्टिक चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. आजवर दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमधून मधुर भांडारकरने समाजातील अनेक घटकांचे खरेखुरे चित्रण पडद्यावर दाखवले होते. त्यामुळेच प्रेक्षकांना ‘कॅलेंडर गर्ल्स’विषयी प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटात फॅशन इंडस्ट्रीच्या मोहजालाकडे आकर्षित झालेल्या पाच तरूणींची कथा सांगण्यात आली आहे. या तरूणींना फॅशनच्या जगाची आणि प्रसिद्धीची कशाप्रकारे चटक लागते आणि  प्रसिद्धीच्या शिखरावरून खाली कोसळल्यानंतर त्यांची अवस्था काय होते, या सगळ्याचे चित्रण ‘कलेंडर गर्ल्स’ मध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी मधुर भांडारकर यांनी अवनी मोदी, सत्रुपा प्याने, कायरा दत्त, आकांक्षा पुरी आणि रुही सिंग या नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा