‘ओ फॅनी रे’नंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूरच्या ‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटातील ‘शेक युअर बुटिया’ गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. अतिशय मजेशीर असलेल्या या गाण्यास सचिन-जिगरने लिहले असून दिव्या कुमारने गायले आहे. गमतीशीर अशा या गाण्यात चित्रपटातील सर्व मुख्यकलाकारांचे मुखवटे घातलेले कलाकार विचित्र अंदाजात नाचताना दिसतात.
गोव्यातील रोडट्रीपवर चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा लहानपणीच्या मित्रांचा शोध घेत असलेल्या पाच पात्रांवर आधारित आहे. होमी अदाजानिया दिग्दर्शित आणि सैफ अली खानच्या इल्युमिन्ती फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘फाइंडिंग फॅनी’चे चित्रीकरण ऑक्टोबर २०१३ला सुरु करण्यात आले होते. त्यानंतर केवळ ४१ दिवसांत हे चित्रीकरण पूर्ण झाले. १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Story img Loader