नुकतेचं आगामी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘दीवानी मस्तानी’ गाणे प्रदर्शित करण्यात आले.
फोटो गॅलरी: मस्तानीचा ‘रॉयल वॉक’
या गाण्यातील दीपिकाचा लूक हा लक्षवेधक तर आहेचं पण खास प्रशंसा करावी वाटतेय ती दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांची. आपल्या चित्रपटात भव्य सेट उभे करण्यात भन्सालींचा हातखंडाच आहे. त्यात या गाण्यात त्यांनी शीश महल उभारला असून त्याच रंगाचे कपडे दीपिका आणि इतर नृत्य कलाकारांना देण्यात आले आहेत. या गाण्याची सुरुवात ‘नवतुनी आली अप्सरा’ या पोवाड्याने करण्यात आलेली असून, यातील अप्सरा दुसरी कोणी नसून बाजीरावची (रणवीर) मस्तानी (दीपिका) आहे. यात रणवीर आणि प्रियांका चोप्राचीदेखील हलकीशी झलक पाहावयास मिळते. या गाण्याच्या चित्रीकरणाकरिता तब्बल ११ दिवस लागल्याचे दीपिकाने लॉन्चवेळी सांगितले. ‘दिवानी मस्तानी’तील पोवाडा गणेश चंदनशिवे यांनी गायला असून श्रेया घोषालने आपल्या सुमधूर आवाजात गाण्यास संगीतबद्ध केले आहे. याआधी चित्रपटातील ‘गजानना’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला ‘बाजीराव मस्तानी’ १८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader