संजय लीला भन्सालीच्या आगामी ‘राम लीला’ चित्रपटातील ‘लहू मुँह लग गया’ गाणे प्रदर्शित झाले आहे. दीपिका-रणवीरवर चित्रीत करण्यात आलेले हे एक प्रणयरम्य गाणे आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेला उधाण आलेले असतानाच या गाण्यात दोघांचा किसींग सीनदेखील दाखविण्यात आला आहे.
‘लहू मुँह लग गया’ गाणे शैल हाडाने गायले असून, मॉण्टी शर्मा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्सालीने संगीत दिग्दर्शन केले आहे.

Story img Loader