एका भव्य सोहळ्यात फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या ध्वनिफीत अनावरणाचा कार्यक्रम मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. चित्रपटातील ‘इंडियावाले’ आणि ‘मनवा लागे’ या दोन गाण्यात फार वेगळे असे काही जाणवले नसले, तरी आयटम प्रकारातील ‘लव्हली’ या आगामी गाण्याच्या टिझरमधील नजरेस पडणारी दीपिका पदुकोणची हॉट अदा चाहात्यांना या गाण्याचा व्डिडिओ पाहाण्यासाठी अतूर करेल. टिझरमध्ये गाण्याच्या सुरुवातीला मोहिनी… मोहिनी… असा गजर करणारी गर्दी नजरेस पडते आणि थोड्याच वेळात दीपिका आपल्या मादक अदाने सर्वांना भूरळ घालताना दिसते. चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सुध आणि विवान शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader