उलथापालथ आणि आश्चर्यकारक घडामोडींनी भरलेल्या ‘डिटेक्टीव व्योमकेश बक्षी’ या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता सुशांत सिंग राजपूत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून बॉलीवूडप्रेमींमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमध्ये सुशांत सिंग राजपूतसह चित्रपटातील अन्य पात्रेही पहायला मिळतात. यामध्ये हेरॉईनची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश असून, ही व्यक्तिरेखा टेलिव्हिजन स्टार मियांग चँगने साकारली आहे. याशिवाय, ट्रेलरमधील दृश्यांमधून १९४३ सालच्या कोलकाता शहराची झलकही पहायला मिळते. कोलकात्यामधील वेगवेगळ्या स्थळी व्योमकेश बक्षी वेगवेगळया लोकांना भेटताना आणि रहस्ये सोडवताना दिसतो.  ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ चित्रपटाची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्यामुळे १९४३सालचा काळ तंतोतंत उभा करण्यासाठी व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. ‘डिटेक्टिव व्योमकेश बक्षी’ चे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जीने केले असून यशराज बॅनरने निर्मिती केली आहे.

 

Story img Loader