आगामी ‘रेगे’ चित्रपटातील ‘ढिचक्यॅव’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. मजेदार पद्धतीने या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आलेय. सदर गाण्यात सई ताम्हणकर, संतोष जुवेकर, आदिनाथ-उर्मिला कोठारे, प्रथमेश परब, प्रिया बापट, रवी जाधव, अवधूत गुप्ते, मनवा नाईक हे गाण्याचे रेकॉर्डिंग करताना पाहावयास मिळतात. ‘हिरो गिरी के फंदे मे बंदे खालिपिली हो जायेगा ढिचक्यॅव’ असे गाण्याचे बोल असून यास अवधूत गुप्तेने गायले आहे.
मुंबई पोलीस दलातील प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे दोघेही पोलीस आणि गुन्हेगारी वर्तुळात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणून प्रसिद्ध. हे दोघेही बहुचर्चित आणि वादग्रस्त. निर्माते-दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या आगामी ‘रेगे’ या चित्रपटात या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या व्यक्तिरेखा त्यांच्या नावासह पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘प्रदीप शर्मा’ची, तर पुष्कर श्रोत्री ‘सचिन वाझे’च्या भूमिकेत दिसतील. महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, आरोह वेलणकर, संतोष जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेगे’चं छायालेखन छायाचित्रकार महेश लिमयेने केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा