झोया अख्तरचे दिग्दर्शन असलेल्या ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.
गाण्याची सुरुवातीला रणवीर सिंग झोपेतून उठताना दिसतो. त्यानंतर शेफाली आणि अनिल कपूर यांच्यातील प्रेम बहरताना दाखविले आहे. मग प्रियांका आणि गाण्याचा रियाझ करत असलेला फरहान अख्तर, अनुष्का शर्मा यांची एन्ट्री होते. या चित्रपटाचा ट्रेलर तर प्रदर्शित व्हायच्या आधीपासूनच सोशल मीडियावर त्याची सॉलिड चर्चा रंगली होती. तो रिलीज झाल्यावरही ‘ट्विटर’, ‘फेसबुक’वर टॉपटेन ट्रेण्ड्समध्ये बराच चर्चेत होता. ट्रेलर रिलीजच्या वेळी भारतात तो टॉप फाइव्ह ट्रेण्डिंगमध्ये होता. एका दिवसात ‘यू टय़ूब’वर या व्हिडीओला सात लाखांवर व्हय़ूज मिळाले होते.

Story img Loader