दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रोमान्सचा बादशाह शाहरुख खान आणि बॉलीवूड अभिनेत्री काजोलच्या बहुप्रतिक्षीत ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘दिल तो सभी के पास होता है…लेकिन सब दिलवाले नही होते’, असे म्हणत शाहरुख पुन्हा एकदा ‘सिमरन’चे मन जिंकण्यास आणि पडद्यावर ‘डीडीएलजे’पर्व जिवंत करण्यास सज्ज झाला आहे. मनाचा ठाव घेणारे रोमॅण्टीक लोकेशन्स, तितक्याच रोमॅण्टीक सिन्ससोबतच यावेळी चित्रपटात रोहित शेट्टीच्या ‘अॅक्शनपॅक सिन्स’ची भर पडल्याने यंदाचा ‘दिलवाले’ मनोरंजन, अॅक्शन, रोमान्स आणि ड्रामा असा परिपूर्ण असणार, असे ट्रेलरवरून दिसून येते. शाहरुख, काजोलसह अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सनोन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून शाहरुखची पत्नी गौरीने निर्मिती केली आहे.

Story img Loader