राष्ट्रीय पारितोषीक विजेती बॉलिवूड स्टार परिणीती चोप्रा व सिध्दार्थ मल्होत्रा यांच्या भूमिका असलेल्या ‘हसी तो फसी’ या चित्रपटातील पहिले गाणे ‘ड्रामा क्वीन’ रिलिज करण्यात आले आहे.     
अमिताब भट्टाचार्य लिखीत व विशाल दादलाणी आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या ‘ड्रामा क्वीन’ या धमाल गाण्यावर परिणीती आणि सिध्दार्थ थिरकले आहेत.
‘हसी तो फसी’ चित्रपटात परिणीती आणि सिध्दार्थ यांनी मीता व निखील ही पात्रे साकारली आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तरूणवर्ग हे गाणे डोक्यावर घेईल असा निर्मात्यांनी अंदाज बांधला आहे.     
व्हिनिल मॅथिव यांनी ‘हसी तो फसी’ या चित्रपटाचे दिग्गर्शन केले असून, धर्मा आणि फॅन्टॉम या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ७ फ्रेब्रुवारीला प्रदर्शीत होणार आहे.
संपूर्ण गाणे पाहा:        

Story img Loader