आगामी टडिटेक्टीव ब्योमकेश बक्षीट चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुशांत सिंग राजपूत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
१९४३ सालातील कोलकाता शहर यात दाखविण्यात आले असून व्योमकेश बक्षी गूढ सोडविताना दिसतो. ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ चित्रपटाची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्यामुळे १९४३सालचा काळ तंतोतंत उभा करण्यासाठी व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. ‘डिटेक्टिव व्योमकेश बक्षी’ चे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जीने केले असून यशराज बॅनरने निर्मिती केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader