राष्ट्रीय पारितोषिकासह वेगवेगळ्या महोत्सवात पुरस्कार आणि रसिकांच्या मान्यतेची मोहोर उमटविणारा ‘फॅण्ड्री’हा चित्रपट आता गुगल प्ले आणि फेसबुकवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. निर्माते विवेक कजरिया व नीलेश नवलखा यांनी ही नवी वाट चोखाळली असून, सिख्या एण्टरटेन्मेंट आणि सिनेकॅरवॉन यांच्या संयुक्त विद्यमाने फॅण्ड्री आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे.
गुगल प्ले, फेसबुकसह आयटय़ून्स, अॅमेझॉन, बीएसकेवायबी, क्रॅकल आदी विविध माध्यमांतून वेगवेगळे चित्रपट जागतिक स्तरावर प्रदर्शित केले जात आहेत. यानिमित्ताने मराठी चित्रपट जागतिक पातळीवर जाण्यास सुरुवात झाली आहे. सध्याचे युग हे भ्रमणध्वनी आणि संगणकाचे असल्याने त्याचा वापर करून घेऊन काही चांगल्या कलाकृती जगभरातील प्रेक्षकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भारतातील आणि जगातीलही बहुतांश तरुण वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थी भ्रमणध्वनी आणि इंटरनेटचा वापर करत आहेत. याचा फायदा चित्रपटांसाठी करून घेण्यासाठी हा नवा प्रयोग करण्यात आला आहे. अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या भ्रमणध्वनीवर ‘गुगल प्ले’च्या माध्यमातून हा चित्रपट सशुल्क डाऊनलोड करता येणार आहे. गुगल प्लेवर सध्या या अॅप्लिकेशनला ४.५ स्टार मिळाले आहेत.
निर्मात्यांना त्यांचे सर्व हक्क अबाधित राखून आपल्या स्वत:च्या काही अटींवर चित्रपट सादर करता येऊ शकतो. एखादा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवडे, महिने तो तेथे सुरू असतो. त्यानंतर चित्रपटगृहातून तो चित्रपट बदलून दुसरा चित्रपट प्रदर्शित केला जातो. रसिकांना त्यांचा आवडता किंवा एखादा गाजलेला चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी किंवा तो कायमस्वरूपी संग्रही ठेवण्याकरिता या माध्यमाचा उपयोग होणार आहे.
https://play.google.com/store/movies/details/Fandry?id=grtxmNofk4Y
(गुगल प्ले),
https://www.facebook.com/Fandrythefilm?sk=app https://www.facebook.com/Fandrythefilm?sk=app 223615011031939 (फेसबुक) किंवा
https://itunes. Apple.com/us/movie/fandry/id925136042 (आयटय़ून्स) वर जाऊन ‘फॅण्ड्री’ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
फॅण्ड्री हा आता गुगल प्ले, फेसबुकवरही
राष्ट्रीय पारितोषिकासह वेगवेगळ्या महोत्सवात पुरस्कार आणि रसिकांच्या मान्यतेची मोहोर उमटविणारा ‘फॅण्ड्री’हा चित्रपट आता गुगल प्ले आणि फेसबुकवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. निर्माते विवेक कजरिया व नीलेश नवलखा यांनी ही नवी वाट चोखाळली असून, सिख्या एण्टरटेन्मेंट आणि सिनेकॅरवॉन यांच्या संयुक्त विद्यमाने फॅण्ड्री आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे.
First published on: 04-11-2014 at 07:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch fandry now on itunes google play facebook