‘बँग बँग’च्या दिलखेचक ट्रेलरनंतर चित्रपटातील ‘तु मेरी’ हे पहिलेच गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याद्वारे हृतिक आणि कतरिनाने पुन्हा एकदा आपली जादू चालवली आहे.
विशाल शेखरचे संगीत असलेल्या ‘तु मेरी’ या पेप्पी डान्स साँगमध्ये बॉलीवूडचा नृत्याचा बादशाह हृतिक रोशन हा कतरिनाला गाण्याने आणि नृत्याने आपल्या प्रेमजालात पाडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. चित्रपटात राजीव नंदाच्या भूमिकेतील हृतिक भाव खाऊन जातो याबद्दल काहीच शंका नाही. तर दुसरीकडे हर्लिन सहानीच्या भूमिकेतील कतरिना लाल रंगाच्या फ्रॉकमध्ये मोहित करते. सिद्धार्थ राज आनंद दिग्दर्शित ‘बँग बँग’ हा टॉम क्रुझ-कॅमेरॉन डियाझ यांच्या ‘नाइट अँण्ड डे’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण थायलंड, ग्रीस, शिमला, मनाली, अबू धाबी आणि दिल्ली येथे करण्यात आले आहे. 

Story img Loader