बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी बॉस चित्रपट प्रदर्शित होण्याच्या उंबरठ्यावर आहे. नुकताच बॉक्सऑफीसवर तसा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अक्षय कुमारला बॉस चित्रपटाकडून सुपरहिट होण्याच्या अपेक्षा आहेत. मुख्यम्हणजे, चित्रपटात अक्षयचे संवाद चपखल हरियाणा भाषेत आहेत त्यामुळे यात तो बाजी मारून जाईल अशीच चिन्हे आहेत. तसेच अक्षय म्हटले मग, चित्रपटात अॅक्शन सिन्स असणारच हे गणितही प्रेक्षकांच्या तितकेच तोंडपाठ त्यामुळे ही चित्रपट बॉक्सऑफिसवर धम्माल करेल अशी आशा चित्रपटाचा दिग्दर्शक अॅन्थनी डिसूझाने व्यक्त केली आहे.

Story img Loader