बॉलीवूड सुपरस्टार ऋतिक रोशनचा बहुचर्चित चित्रपट ‘क्रिश-३’चा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘क्रिश’प्रमाणे या चित्रपटातही हृतिक दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच रोहित (हृतिक) ‘जादू’ला (एलियन) सौरऊर्जेपासून मिळणा-या शक्तीचे कोडे उलगडून नवीन शोध लावताना दिसतो. ‘क्रिश’विरुद्ध असलेल्या कालची भूमिका विवेक ऑबेरॉय करत आहे. ट्रेलरमध्ये कंगनाची छोटीशी झलकही पाहण्यास मिळते. या चित्रपटाचा काही भाग हा मार्वेल सुपरहिरो चित्रपट ‘द अॅव्हेंजर’ची आठवण करून देतो.
राकेश रोशन दिग्दर्शित आणि निर्मित ‘क्रिश-३’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कंगना राणावत, विवेक ओबेरॉय आणि शरयू चौहान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader