रिअॅलिटी शो आणि पुरस्कार सोहळयांमध्ये सूत्रसंचलन करणारा मनिष पॉल ‘मिकी वायरस’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘मिकी वायरस’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘मिकी वायरस’ हा एक विनोदी चित्रपट आहे.
अॅन्टी वायरस कंपनींसाठी काम करण्या-या मुलाची भूमिका मनिषने या चित्रपटात साकारली आहे. हॅकिंग करणा-या सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना अडचण येत असल्याने ते विकीची (मनिष पॉल) मदत घेतात, यावर चित्रपटाची कथा चित्रित करण्यात आली आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ आणि ‘फुकरे’ यांसारख्या चित्रपटानंतर प्रेक्षकांना ‘मिकी वायरस’ हा विनोदी चित्रपट सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
मनिषसोबत एल्ली अवरम, मनिष चौधरी, वरुण बडोला, पूजा गुप्ता, नितीश पांड, राघव कक्कर आणि विकेश कुमार यांच्या भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2013 रोजी प्रकाशित
पहाः मनिष पॉलच्या ‘मिकी वायरस’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर
रिअॅलिटी शो आणि पुरस्कार सोहळयांमध्ये सूत्रसंचलन करणारा मनिष पॉल 'मिकी वायरस' चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 20-07-2013 at 11:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch first trailer of manish paul in mickey virus