रिअॅलिटी शो आणि पुरस्कार सोहळयांमध्ये सूत्रसंचलन करणारा मनिष पॉल ‘मिकी वायरस’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘मिकी वायरस’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘मिकी वायरस’ हा एक विनोदी चित्रपट आहे.
अॅन्टी वायरस कंपनींसाठी काम करण्या-या मुलाची भूमिका मनिषने या चित्रपटात साकारली आहे. हॅकिंग करणा-या सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना अडचण येत असल्याने ते विकीची (मनिष पॉल) मदत घेतात, यावर चित्रपटाची कथा चित्रित करण्यात आली आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ आणि ‘फुकरे’ यांसारख्या चित्रपटानंतर प्रेक्षकांना ‘मिकी वायरस’ हा विनोदी चित्रपट सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
मनिषसोबत एल्ली अवरम, मनिष चौधरी, वरुण बडोला, पूजा गुप्ता, नितीश पांड, राघव कक्कर आणि विकेश कुमार यांच्या भूमिका आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा