अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेल्या ‘जंजीर’ या प्रसिध्द चित्रपटाचा रिमेक दिग्दर्शक अपूर्व लाखिया याने केला असून याचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तेलगू चित्रपटसृष्टीतला आघाडीचा नायक राम चरण या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि संजय दत्त यांच्या सुध्दा प्रमुख भूमिका आहेत. प्राण यांनी साकारलेली मूळ चित्रपटातील शेरखानची भूमिका रिमेकमध्ये संजय दत्त करत आहे.
तेलगू सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरण हा मुंबईतील माफिया गॅंगविरुद्ध लढणा-या पोलिसाच्या (विजय) भूमिकेत असून प्रियांका चोप्राने त्याच्या प्रेयसीची भूमिका केली आहे. विजय (राम चरण) आणि शेरखान (संजय दत्त) हे दोघे मिळून मुंबईला गुन्हेगारीमुक्त करतात, असे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

पहा जंजीर चित्रपटाचा पहिला ट्रेलर

Story img Loader