शाहिद कपूरने अभिनय केलेला राजकुमार संतोषी दिग्दर्शित विनोदी अॅक्शनपट ‘फटा पोस्टर निकला हिरोचा’ पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  ‘बर्फी’ चित्रपटाने पदार्पण करणारी इलियाना डिक्रुझ ही शाहिदसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
काहीवेळापासून चंदेरी दुनियापासून दुरावलेला शाहीद या चित्रपटाने पुन्हा प्रेक्षकांना दिसेल. चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणे ट्रेलरच्या सुरुवातीलाच रणबीर-कतरिनाच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाचा पोस्टर फाडून शाहीद पोलिसाच्या वेशात येताना दिसतो. ट्रेलरमध्ये जरी शाहिद पोलिसाच्या वेशात दिसत असला तरी त्याने चित्रपटात नटाची भूमिका केली आहे.
रमेश तौरानी, सिद्धार्थ रॉय कपूर आणि रॉनी स्क्रुवाला यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader