यामी गौतम आणि पाकिस्तानी कलाकार अली जाफरच्या ‘टोटल सियाप्पा’ या चित्रपटाचा हास्यविनोदाने भरलेला पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहताना नक्कीच तुम्हाला हसू आवरणार नाही. अली जाफर या चित्रपटात अमन नावाच्या पाकिस्तानी युवकाची भूमिका साकारत असून, आशा नावाच्या भारतीय मुलीची भूमिका यामी गौतम करीत आहे. ‘अ वेनसडे’ आणि ‘स्पेशल २६’ चित्रपटाचा कथाकार नीरज पांडेने या चित्रपटाची कथा लिहिली असून, दिग्दर्शन इश्वर निवासचे आहे. चित्रपटाला संगीत चित्रपटातील नायक अली जफरने दिले आहे. लंडनमध्ये स्थायिक झालेल्या अमन आणि आशा यांची ही कथा आहे. अनुपम खेर आणि किरण खेर या आपल्या सासू-सासऱ्यांना अमन कशाप्रकारे मनविण्याचा प्रयत्न करतो ते या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. तसेच, भारत आणि पाकिस्तमध्ये असलेल्या मतभेदांवर देखील चित्रपटात भर देण्यात आला आहे. आशाच्या कुटुंबियांना मनविण्यासाठी अमन कसा प्रयत्न करतो ते या ट्रेलरमध्ये दिसते.

Story img Loader