शाहरूख खानची पत्नी गौरी आणि रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांच्या मित्र परिवारापैकी एकाच्या मुलाचा लग्न सोहळा व्हिनसमध्ये पार पडला. लग्नातील संगीत कार्यक्रमात गौरी आणि नीतूने नृत्याचा आनंद लुटला. यावेळी दिग्दर्शक करण जोहर आणि प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रानेदेखील आपले नृत्यकौशल्य सादर केले. सोफी चौधरी, सिमा खान, महीप कपूर, भावना पांडे आदी बॉलिवूडकरांनी व्हिनसमध्ये पार पडलेल्या लंडनस्थित अश्विन ग्रोव्हर आणि रिया खिलनानी यांच्या लग्नसोहळ्यास उपस्थिती लावली. नीतू कपूरने नृत्य करतानाचा आपला व्हिडिओ इंन्स्टग्रामवर शेअर केला आहे. अन्य एका व्हिडिओमध्ये नीतू सिंग ‘बेबी डॉल’ गाण्यावर करण जोहरबरोबर ठेका धरताना दिसते.

तर ‘चिटियाँ कलाइयाँ’ गाण्यावर गौरी खान करण जोहर आणि मनिष मल्होत्राबरोबर ठुमका लावताना दिसत असून बॉलिवूडकरांनी या लग्न सोहळ्यात नाच-गाण्याचा पुरेपूर आनंद लुटल्याचे व्हिडिओ पाहताना जाणवते.

Story img Loader