मि. परफेक्शनिस्ट आमिर आणि कतरिनाने ‘धूम ३’ मधील मलंग या गाण्यात ‘अॅक्रोबॅट अॅक्ट’ केले आहे. हे अॅक्ट उत्तमरित्या करण्यासाठी दोघांनी केलेल्या पूर्वतयारीचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘धूम ३’च्या निर्मात्यांनी आमिर-कतरिनाला अॅक्रोबॅट अॅक्ट म्हणजेच डोंबारी नृत्य शिकवण्यासाठी सिर्क दे सोलेल यांना नियुक्त केले होते.

‘धूम ३’मधील भूमिकेसाठी आमिरला कठोर आणि सधन प्रशिक्षणाला समोरे जावे लागले आहे. त्याने सर्कशीत जाऊन तेथे प्रशिक्षण घेतले. इतकेच नाही तर परिपूर्ण चोराची भूमिका साकारण्याकरिता शरिरास योग्य आकार येण्यासाठी त्याने दोन वर्षे सक्त आहारही घेतला.

अशा प्रकारच्या अॅक्टसाठी किमान दोन वर्षांचा अवधी लागतो. मात्र, आमिर आणि कतरिनाने केवळ काही आठवड्यांतच या अॅक्टचे काम पूर्ण केल्याचे चित्रपट दिग्दर्शकाने सांगितले.

Story img Loader