गणेशोत्सव हा सर्वांचाच आवडता सण आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्न वातावरण पसरते. सर्व स्तरातील, धर्मांतील खूप उत्साहाने हा सण साजरा करतात. त्यात आपले बॉलीवूड सेलिब्रिटीही कुठे कमी पडलेले नाहीत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता हृतिक रोशन याने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले होते.  काल सर्वत्र दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यावेळी हृतिकनेही त्याच्या कुटुंबियांसह ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला.


नुकताचं त्याने आपल्या मुलांसह बाप्पासोबतचा एक फोटो ट्विट केला होता.

Story img Loader