बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यातील ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातील केमेस्ट्रीने तुम्हा भारावून गेला असाल, तर ऋतिक-कतरिनाच्या चाहत्यांना पुन्हा एकदा या दोघांची ‘केमेस्ट्री’ पाहण्याची संधी ‘बँग बँग’ चित्रपटातून मिळणार आहे.
नुकतेच ‘बँग बँग’ या चित्रपटातील ‘तु मेरी’ हे पेप्पी डान्स साँग प्रदर्शित करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता या चित्रपटातील ‘मेहेरबान’ हे रोमॅन्टिक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. निळ्याभोर समुद्र किनारी मनमोहक सेटअप आणि ऋतिक-कतरिना यांचा रोमॅन्टिक अंदाज यामुळे हे गाणे रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत आपली वेगळी उंची गाठेल असे म्हटले जात आहे. विशाल-शेखरचे संगीत असलेले हे गाणे शिल्पा राव, शेखर रावजियानी आणि ऐश किंग यांनी गायले आहे.
आणखी वाचा