बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याच्या ‘काबिल’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होऊन काही दिवस झाले असतानाच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हृतिकने आपल्या ट्विटर हॅण्डलवर टीझरची लिंक ट्विट केली आहे. ‘मी ज्यांचे निरीक्षण करायला गेलो..पाहायला गेलो..तेच हजारो जण त्यांच्या मनचक्षूंनी मला पाहत होते..मनचक्षूंना सारे काही दिसते’, अशा मथळ्यासह हृतिकने ‘काबिल’चा टीझर प्रदर्शित केला आहे.
‘काबिल’ चित्रपटात हृतिकसोबत अभिनेत्री यामी गुप्ता दिसणार असून, चित्रपट २०१७ साली २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
VIDEO: ‘त्या’ डोळ्यांमागचे रहस्य काय?, हृतिकच्या ‘काबिल’चा टीझर प्रदर्शित
चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होऊन काही दिवस झाले असतानाच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 05-05-2016 at 14:37 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch hrithik roshans kaabil first teaser out