‘दृश्यम’नंतर निशिकांत कामत आता एक अॅक्शन पॅक्ड चित्रपट घेऊन येत आहे. ‘रॉकी हॅण्डसम’ हा त्याचा आगामी चित्रपट असून जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यात प्रमुख भूमिकेत दिसतील.  प्रसिद्ध कोरियन चित्रपट ‘दी मॅन फ्रॉम नोवेअर’ या  चित्रपटाचा हा बॉलिवूड रिमेक आहे.
‘रॉकी हॅण्डसम’ चित्रपटातील जॉनच्या अॅक्शन सीनने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटात जॉन काही पोलिसांना मारत असतानाचे दृश्यदेखील चित्रीत करण्यात आले आहे. याच्या मेकिंगचा व्हिडिओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केलायं. जॉनने स्वतः हा व्हिडिओ ट्विट केला असून सदर अॅक्शन सीन कसा चित्रीत केला गेला त्याचे वर्णन यात केलेय.
अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती संस्था ‘जेए एन्टरटेन्मेन्ट’ आणि सुनीर क्षेत्रपालची ‘आझुरे एन्टरटेन्मेन्ट’ यांच्या संयुक्तविद्यमाने ‘रॉकी हॅन्डसम’ची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट २५ मार्चला प्रदर्शित होईल.

Story img Loader