‘मद्रास कॅफे’ चित्रपटाच्या निर्मिती संस्थेतर्फे ‘मौला सुन ले रे’ या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणे पॅपओनने गायले आहे. हा चित्रपट श्रीलंकेतील नरसंहारावर आधारित आहे. गाण्याच्या सुरुवातीला लष्करी अधिका-याच्या भूमिकेतील जॉन अब्राहम श्रीलंकेतील एका गुप्त मोहिमेवर जाताना दिसतो. रस्ता आणि समुद्रमार्गे जॉन श्रीलंकेला पोहोचतो. चित्रपटात विदेशी पत्रकाराची भूमिका साकारत असलेली नर्गिस फाखरी श्रीलंकेतील परिस्थितीचा आढावा घेताना दिसते. याशिवाय यात गोळीबार, बॉम्बस्फोट आणि रक्तपाताची दृष्येसुद्धा दिसतात. ‘विकी डोनर’ चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेला दिग्दर्शक शूजीत सिरकर या चित्रपटाचा दिग्दर्शक असून, हा चित्रपट २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

पहा गाण्याचा व्हिडिओ:

Story img Loader