करिना कपूर आणि इमरान खान यांच्या ‘गोरी तेरी प्यार मे’ चित्रपटातील ‘दिल डफर’ गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘दिल डफर’ हे प्रेमपर गाणे आहे. ऐकण्यास सुमधुर असे हे रोमॅण्टिक गाणे श्रुती पाठक आणि नितेश कदम यांनी गायले असून, त्याचे संगीत दिग्दर्शन विशाल-शेखर या जोडीचे आहे. याआधी प्रदर्शित झालेले आयटम गाणे ‘चिंगम चबाके’ आणि विवाहयोग्य गाणे ‘टूँह’ यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरनेही महत्वाची भूमिका केली आहे. करण जोहर निर्मित ‘गोरी तेरे प्यार मे’ २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader