‘गोरी तेरे प्यार में’ च्या निर्मात्यांनी चित्रपटातील ‘चिंगम चबाके’ या आणखी एका गाण्याचा व्हिडिओ प्रसिध्द केला आहे. हे गाणे करिना कपूर आणि इमरान खानवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल अनवित दत्त गुप्ता, कौशर मुनिर आणि कुमारचे असून, शंकर महादेवन आणि शाल्मली खोलगडेने हे गाणे गायले आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक पुनित मल्होत्राचे म्हणणे आहे की, चित्रपटाचे संगीत दमदार झाले असून, आम्ही यावर खूप मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. २०१० मध्ये आलेल्या ‘आय हेट लव्ह स्टोरी’ चित्रपटासाठी पुनितबरोबर काम केलेल्या विशाल-शेखर यांचेच संगीत या चित्रपटाला आहे. यात श्रध्दा कपूर देखील काम करत आहे. निर्माता करण जोहरचा हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
पाहा गाण्याचा व्हिडिओ

Story img Loader