आगामी लक्षवेधी ‘धूम ३’ चित्रपटातील पहिले गाणे यशराजने प्रदर्शित केले आहे. आमिरने जाहीर केल्याप्रमाणे सचिनला हे गाणे अर्पित करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता ‘धूम ३’चे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आले. युट्युबवर हे गाणे प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्यास लगेचच शेअर करण्यास सुरुवात केली.
सचिनसाठी आमिरची खास भेट

गाण्याच्या सुरुवातीला ‘धूम’च्या पहिल्या दोन भागातील गाण्याची झलकही पाहण्यास मिळते. कतरिनावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे अदिति सिंहने गायले असून प्रीतमने यास संगीत दिले आहे. याआधी ऐश्वर्या राय, ईषा देओल आणि टाटा यंग यांनी धूमचे टायटल ट्रॅक केले होते.

Story img Loader