बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग, अली झफर, गोविंदा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा अशी हटके स्टारकास्ट असलेल्या आगामी किल दिल चित्रपटाचा ट्रेलर गुरूवारी प्रदर्शित करण्यात आला.
चित्रपटात देव नावाची भूमिका साकारणारा रणवीर सिंग या ट्रेलरमध्ये लेदर जॅकेट, जिन्स आणि ‘क्लिन शेव्ह’ लूकमध्ये दिसत असून “मैं तबसे गन चला रहा हूं..जब से तू अपने माँ के अंदर नही..अपने बाप के अंदर था.” अशा रोखठोकी संवादाने लक्ष वेधून घेताना दिसतो. तर, परिणीती चोप्राही ट्रेलरमध्ये बेधडक आणि बिनधास्त अंदाजात ‘बोल्ड’ आणि ‘ब्युटीफूल’ या दोन्ही रुपात नजरेस पडते. दुसऱयाबाजूला हाती भली मोठी बंदूक आणि सडेतोड संवादाने अभिनेता अली झफर आपल्या खलनायकी रुपाचे दर्शन घडवतो आणि चित्रपटातील स्टारकास्टमध्ये सर्वात अनुभवी स्टार गोविंदा आपल्या खलनायकी हास्याने ट्रेलरवर आपली वेगळी छाप पाडून जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch kill dil trailer govinda back as the bad guy