तामिळ सुपरस्टार रजनीकांत तीन वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर ‘कोचादैय्या’ चित्रपटाने पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘ इथे हिरो आहेत, सुपरहिरोदेखील आहेत. पण, रजनीकांत एकच आहे’, या टॅगलाइनने चित्रपटाच्या टीझरची सुरुवात करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा आठव्या शतकातील पांडियाचा राजा कोचादैय्यान रनाधिरन याच्यावर आधारित आहे.
रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या अश्विनने ‘कोचादैय्या’चे दिग्दर्शन केले असून ती या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. टीझरमध्ये दीपिकाची झलक पाहावयास मिळत नाही. त्यासाठी, दुस-या ट्रेलरची प्रतिक्षा करण्याची गरज असल्याचे सौंदर्यांने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दीपिकाने वंदना देवीची भूमिका साकारली आहे. ‘कोचादैय्याचे’ संगीत दिग्दर्शन ऑस्कर विजेता ए.आर.रहमानने केले असून हा चित्रपट रजनीकांत यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच १२ डिंसेबरला प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Sep 2013 रोजी प्रकाशित
पहाः सुपर रजनीकांतच्या ‘कोचादैय्या’चा ट्रेलर
तामिळ सुपरस्टार रजनीकांत तीन वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर 'कोचादैय्या' चित्रपटाने पदार्पण करत आहे.

First published on: 10-09-2013 at 10:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch kochadaiiyaan trailer rajinikanth is back as a warrior