होय! ‘देढ इश्किया’ चित्रपटाद्वारे माधुरी दिक्षित नजाकतभरी नृत्य अदाकारी घेऊन येत आहे. चित्रपटातील ‘हमरी अटरीया पे’ या गाण्याचा व्हिडिओ चित्रपटकर्त्यांनी प्रसिध्द केला असून, प्रसिध्द कॉरिओग्राफर रेमो फर्नांडिसने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. माधुरी आणि रेमो ‘झलक दिखला जा’ या ‘सेलेब्रिटी डान्स शो’चे परिक्षक देखील होते. ‘हमरी अटरीया पे’ या गाण्याचे बोल गुलझार यांचे असून, आवाज रेखा भारद्वाजचा आहे. गाण्यात उच्च दर्जाचा आविष्कार दिसण्यासाठी चित्रपटकर्त्यांतर्फे सर्वतोपरी काळजी घेण्यात आल्याने, हे गाणे खचितच सुंदर झाले आहे. बोगम पाराच्या भूमिकेतील माधुरीचा कलात्मक नृत्याविष्कार माधुरीच्या चाहत्यांना नक्कीच नेत्रसुख देईल.
अभिषेक दुबे दिग्दर्शित आणि नासिरुद्दीन शाह, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, विजय रझा, श्रध्दा कपूर आणि अमरिता पुरी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

Story img Loader