बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘डिटेक्टीव व्योमकेश बक्षी’चा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या मोशन पोस्टरमध्ये केवळ ३० सेकंदांमध्ये आपली जादू चालविण्यास सुशांत यशस्वी झालेला दिसतो. स्वस्तिका मुखर्जीचीही भूमिका असलेला हा चित्रपट पुढील वर्षी १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
कोलकाता शहरात या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण झाले आहे. ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बॅनर्जी’ चित्रपटाची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्यामुळे १९४०सालचा काळ तंतोतंत उभा करण्यासाठी व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. ‘डिटेक्टिव व्योमकेश बक्षी’ हा चित्रपट दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित करत असून यशराज बॅनर याची निर्मिती करत आहे.

Story img Loader