बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी रॉय चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरची चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्कंठा लागून राहिली आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर सध्या प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच ट्रेलरही प्रदर्शित होईल याची खात्री चाहत्यांना झाली आहे. आणि मोशन पोस्टर पाहता ‘रॉय’ चित्रपट बॉलीवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते.
मोशन पोस्टरमध्ये सुरूवातीला प्रेक्षकांकडे पाठमोरी उभा असलेला रणबीर कपूर दिसून येतो. तो पाहून धुम-३च्या ट्रेलरमधील आमिर खानची झलक आठवते. त्यानंतरच्या फ्रेममध्ये आणखी एक व्यक्ती समोर येते. अंदाज बांधल्यास ही व्यक्ती अर्जुन रामपाल असल्याचे चुणूक लागून राहते. तीसऱया फ्रेममध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस दृष्टीस पडते. या तीन कलाकरांच्या फ्रेमआधी दृष्टीस येणारे ‘ अ थिफ, अ स्टोरी, अ कन्फेशन’ असे तीन शब्द देखील चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा