सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची मुख्य भूमिका असलेल्या ‘हँसी तो फसी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
७ फ्रेबुवारीला प्रदर्शित होत असलेल्या ‘हंसी तो फंसी’ मध्ये परिणीती चोप्राने एका वेड्या शास्त्रज्ञाची भूमिका केली आहे. या सिनेमात ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील सिद्धार्थ मल्होत्रा नायक असणार आहे. सिनेमाच्या पहिल्या लूकच्या लाँचिंगदरम्यान तिने आपल्या भूमिकेचा खुलासा केला आहे.
ती सिनेमात वेड्या मीताचे पात्र साकारत आहे. तर सिद्धार्थ ‘सेंटी’ निखिलची भूमिका करत आहे. चित्रपटाचे नाव आणि प्रोमोच्या झलकवरून हा एक कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट असल्याचे समजते. एका दृश्यात निखिल म्हणतो, ‘कुणाला सांगू नकोस की तू कोण आहेस’ त्यावर मीता म्हणते, ‘मी कोण आहे?’ सिनेमाची निर्मिती करण जोहर, विकास बहल, अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवाणी यांनी केली आहे.

Story img Loader