‘काय पो छे’ चित्रपटाने प्रसिद्धिस आलेला सुशांत सिंग राजपूत आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती परिणिती चोप्रा यांच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे वाणी कपूरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असून ऋषी कपूरचीसुद्धा यात भूमिका आहे. आधुनिक प्रेमकथा असलेल्या या चित्रपटात प्रेम आणि बांधिलकीऐवजी प्रेमानंतर येणारा शुद्ध देसी रोमान्स दाखविला आहे. यात लिव्ह इन रिलेशनशीप आणि त्यानंतर येणा-या अडचणी पाहायला मिळणार आहेत.
यशराज फिल्मसने ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यासाठी जयपूरच्या प्रसिद्ध राज मंदिराची निवड केली. चित्रपटाचे सर्व कथानक जयपूरमध्ये घडत असल्याने या गुलाबी शहराच्या सर्वात जुन्या थिएटरमध्ये ट्रेलरचे अनावर करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. नुकतेच मकाऊवरून परतलेले सुशांत आणि परिणीती समारंभाला उपस्थित होते.
मनिष शर्मा दिग्दर्शित शुद्ध देसी रोमान्स या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा