बॉलिवूडच्या आगामी ‘हमशकल्स’ चित्रपटातील ‘खोल दे दिलकी खिडकी’ या गाण्यात सैफ अली खान, राम कपूर आणि रितेश या तिघांनी अक्षरश: धमाल उडवून दिली आहे. ‘खोल दे दिलकी खिडकी’ या गाण्यासाठी या तिघांनीही स्त्रीवेष धारण केला आहे. गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना सैफ, रितेश आणि राम यांना स्त्रीवेषात पाहिल्यानंतर चित्रपटातील त्यांच्या नायिकांची दांडी गुल झाली. त्यामुळे या तिघांना पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. साजिद खानचे दिग्दर्शन असलेल्या ‘हमशकल्स’ या विनोदीपटात बिपाशा बसू, तमन्ना भाटिया आणि इशा गुप्ता यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. हिमेश रेशमियाने संगीत दिलेले ‘खोल दे दिलकी खिडकी’ हे गाणे मिका सिंग आणि पलक मुच्चल यांनी गायले आहे.