बहुप्रतिक्षित ‘बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा गाणयाचा फर्स्ट लूक शनिवारी प्रदर्शित करण्यात आला होता. दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘पिंगा’ गाण्याचा व्हिडिओ इरॉसने प्रदर्शित केला आहे.
‘पिंगा’ हे गाणे शनिवारीचं प्रदर्शित करण्यात येणार होते. पण, पॅरिस हल्ल्यामुळे या गाण्याचे लॉन्च पुढे ढकलण्यात आले. मात्र, इरॉसने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा’ असे गाण्याचे बोल असून, दीपिका आणि प्रियांकाने त्यांच्या नृत्यअदाकारीने या गाण्यास परिपूर्ण केलेयं. या गाण्यात किरमिजी रंगाच्या नववारी साड्या दोघींनी नेसल्या असून, त्यावर पेशवाई दागिने परिधान केले आहेत. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन रेमो डिसूझाने केले आहे. पिंगा गाण्यात दोन्ही अभिनेत्रींमध्ये हलकिशी जुगलबंदी दाखविण्यात आली असली तरी या दोन्ही अभिनेत्री नृत्याच्या बाबतीत उजव्याचं ठरल्या आहेत.
रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आणि संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट येत्या 18 डिसेंबरला प्रदर्शित होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा