बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ ते हॉलीवूडची ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणाऱया प्रियांका चोप्राने हॉलीवूड अभिनेता ड्वाइन जॉन्सन अर्थात ‘द रॉक’ सोबतच्या ‘बेवॉच’ या आगामी हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रियांकाबद्दल अभिमान वाटतो – शाहिद कपूर

ड्वाईन जॉन्सनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रियांकासोबतचा एक छोटेखानी व्हिडिओ शेअर करून ‘बेवॉच’च्या चित्रीकरणाला सुरूवात केल्याची माहिती दिली. एका छानशा समुद्रकिनारी दोघंही एकमेकांची स्तुती करताना या व्हिडिओत दिसून येतात. सुरूवातीला ड्वाइन हा प्रियांका चोप्राची ती जागतिक सुपरस्टार असल्याची ओळख करून देतो, तर प्रियांका चोप्रा खरंतर ड्वाइन हा सुपरस्टार असल्याचे म्हणते.

पुरुषांची गरज केवळ मुलांना जन्म देण्यासाठी- प्रियांका चोप्रा

नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर आलेली ‘बेवॉच’ ही मालिका अमेरिकेसह जगभरात चांगलीच गाजली होती. दिग्दर्शक सेठ गॉर्डन त्यावर आधारित चित्रपट घेऊन येत आहे.

दरम्यान, गेल्याच महिन्यात प्रियांकाने ‘क्वांटिको’ या अमेरिकन टेलिव्हिजनवरील मालिकेसाठी मानाचा ‘पीपल्स चॉईस अॅवॉर्ड’ पटकावला होता. अमेरिकेतील ‘क्वांटिको’ टीव्ही मालिकेतील एफबीआय एजंटच्या भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉईस अॅवॉर्ड’ पुरस्कार पटकावणारी प्रियांका ही पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली.