‘गुंडे’ चित्रपटाच्या या आधी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्रा कुठेच दिसली नव्हती परंतु, चित्रपटकर्त्यांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये प्रियांकाचा सहभाग आहे. पहिल्या ट्रेलरमध्ये केवळ अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग हे दोघेच दिसल्याने प्रियांकाचे अनेक चाहते नाराज झाले होते. पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांकाचे दर्शन न झाल्याने दुःखी झालेल्या तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. चित्रपटात प्रियांका नंदिता नावाच्या कॅब्रे डान्सरची भूमिका साकारत आहे. ‘गुंडे’ ही विक्रम आणि बाला या दोन मित्रांची कथा आहे. सामान वाहून नेणाऱ्या रेल्वेच्या डब्ब्यातून कोळशाची चोरी करण्यापासून ते ताकदवान कोळसा माफिया बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. हे दोघे जोडीने चोऱ्या करतात असे नाही, तर दोघांचे नंदिता या एकाच मुलीवर प्रेम आहे. चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारा इरफान खान या दोघांना कोलकात्यातून उखडून देण्याची धमकी देतो. मारधाड, प्रेम आणि नृत्य यांचा योग्य मिलाफ असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बस जाफर याचे आहे. चित्रपट पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात दाखल होत आहे.

पाहा ट्रेलर:

Story img Loader