बॉलिवूडची हॉट अभिनेत्री प्रियांका चोप्राने ‘बबली बिनधास्त…’, ‘नाचेगी पिंकी…’ आणि ‘राम चाहे लीला चाहे…’ सारख्या गाण्यांवर हॉट आणि सिझलिंग परफॉर्मन्स देण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. तिच्या येऊ घातलेल्या ‘गुंडे’ चित्रपटातील ‘असलाम ए इश्कुम यारा…’ गाण्यावरदेखील तिने असाच हॉट आणि सिझलिंग परफॉर्मन्स दिला आहे. या चित्रपटात कॅब्रे डान्सरची भूमिका साकारत असलेल्या प्रियांकाने या गाण्यात अतिशय मादक नृत्य सादर केले आहे. गाण्याच्या सुरुवातीला खुर्चीचा प्रॉप म्हणून वापर करणारी प्रियांका आपल्या मादक अदांनी अनेकांच्या हृदयाची धडकन वाढवणार असल्याचे दिसते.
या गाण्यात प्रियांकाबरोबर रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरदेखील नाचताना दिसतात. इरशाद कमीलने लिहिलेले हे गाणे प्रसिद्ध डिस्को किंग बप्पी लाहिरी आणि नेहा बसिनने गायले आहे. कोलकातामधील १९७० सालातल्या माफिया राजच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटात लहानपणापासून छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारे दोन चोर मोठेपणी कोळसा माफिया म्हणून उदयास येताना दर्शविण्यात आले आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या या चित्रपटात प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि इरफान खान यांच्या प्रमुख भूमिका असून, १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार आहे.
पाहा गाण्याचा व्हिडिओ:
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
पाहा ‘गुंडे’ चित्रपटातील प्रियांकाच्या गाण्याचा व्हिडिओ
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री प्रियांका चोप्राने 'बबली बिनधास्त...', 'नाचेगी पिंकी...' आणि 'राम चाहे लीला चाहे...' सारख्या गाण्यांवर हॉट आणि सिझलिंग परफॉर्मन्स देण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-01-2014 at 08:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch priyanka chopra sizzles in gundays asalaam e ishqum