लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘हिरोपंती’ चित्रपटाद्वारे टायगर श्रॉफ बॉलिवूडमधील पदार्पणास सज्ज झाला आहे. या चित्रपटातील ‘रात बाकी’ या गाण्याचा नवा व्हिडिओ चित्रपटकर्त्यांतर्फे युट्युबवर प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर चित्रपटाच्या याआधीच्या व्हिडिओमध्ये उत्कृष्ट अशी हणामारीची दृष्ये साकारताना नजरेस पडलेला टायगर या व्हिडिओत तितक्याच सहजतेने नृत्य करताना दिसतो. ‘रात बाकी’ हे एक ‘पार्टी साँग’ असून, यात टायगर चित्रपटातील किर्ती सनोन या नवअभिनेत्रीबरोबर नृत्य करताना अढळून येतो. चित्रपटाला साजित-वाजित आणि मंज मुस्की यांचे संगीत असून, ‘रात बाकी’ हे गाणे मोहित चौहान आणि श्रेया घोषालने गायले आहे. बबलु आणि डिंपीच्या प्रेमाची कथा असलेला ‘हिरोपंती’ हा एक प्रेमपट आहे. याशिवाय या चित्रपटात अनेक हणामारीची दृष्ये आहेत, ज्यासाठी टायगर श्रॉफने मार्शल आर्टचे खास प्रशिक्षण घेतले. २३ मे रोजी चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या या चित्रपटाचे निर्माता साजिद नाडियादवाला असून, दिग्दर्शन शब्बिर खान यांचे आहे.
पाहा व्हिडिओ:
पाहा : टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती’ चित्रपटातील ‘रात भर’ गाण्याचा व्हिडिओ
लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'हिरोपंती' चित्रपटाद्वारे टायगर श्रॉफ बॉलिवूडमधील पदार्पणास सज्ज झाला आहे. या चित्रपटातील 'रात बाकी' या गाण्याचा नवा व्हिडिओ चित्रपटकर्त्यांतर्फे युट्युबवर प्रसिध्द करण्यात आला आहे.
First published on: 18-04-2014 at 05:40 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch raat bhar from tiger shroffs heropanti