‘रघुपती राघव’ गाण्याच्या १५ सेकंदांच्या टीझरनंतर ‘क्रिश ३’च्या निर्मात्यांनी हे पूर्ण गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्यात हृतिकचा उत्कृष्ट नृत्याविष्कार पाहावयास मिळतो. या चित्रपटात हृतिकसोबत मुख्य भूमिकेत असलेली प्रियांकासुद्धा त्याच्यासोबत थिरकताना दिसते. रघुपतीच्या राघवच्या १५ सेकंदाच्या टीझरने २४ तासात चार लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळवले होते. त्यामुळे पार्टीयुक्त गाण्यांमध्ये आता अजून एका नव्या गाण्याची भर पडली आहे.
राजेश रोशन यांनी संगीत दिलेले रघुपती राघव गाणे नीरज श्रीधर, मोनाली ठाकूर आणि बॉबने गायले आहे. हृतिकव्यतिरीक्त प्रियांका चोप्रा, कंगना आणि विवेक ऑबरॉय यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader