राज कपूर यांचा वारसा सांगणाऱ्या कपूर घराण्याचे वारस करीना, करिश्मा, रणबीर यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे. चित्रपटसृष्टीत आपले स्थान आणि वेगळी अशी ओळख निर्माण करण्यात या तिघांनी यश मिळविले. आगामी ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून शो मॅन राज कपूर यांचा आणखी एक वारसदार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. राज कपूर यांची कन्या रिमा जैन यांचा मुलगा अरमान जैन ‘लेकर हम दिवाना दिल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. लग्नापूर्वी मित्र-मैत्रीण असणाऱ्या जोडप्याचे आयुष्य लग्नानंतर कसे बदलून जाते याची कथा ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. आजच्या तरूणाईचे प्रतिबिंब या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीचा भाऊ आरिफ अली याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2014 रोजी प्रकाशित
राज कपूर यांचा नातू अरमान जैनचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
राज कपूर यांचा वारसा सांगणाऱ्या कपूर घराण्याचे वारस करीना, करिश्मा, रणबीर यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे. चित्रपटसृष्टीत आपले स्थान आणि वेगळी अशी ओळख निर्माण करण्यात या तिघांनी यश मिळविले.

First published on: 08-05-2014 at 02:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch raj kapoors grandson armaan jain in lekar hum deewana dil