रणबीर कपूरच्या आगामी ‘बेशरम’ चित्रपटातील ‘आ रे आ रे’ गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. राजीव बर्नाल यांने लिहलेल्या या गाण्यास मिका सिंग आणि श्रेया घोशालने गायले आहे. तर रेखा आणि चिन्नी प्रकाश यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. चंदीगढमध्ये चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात एकूण २५० डान्सर्स आहेत. ‘आ रे आ रे’चा सेट उभा करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी आणि चित्रिकरणासाठी सहा दिवस लागले. गाण्याच्या सुरुवातीला रणबीरने राजेश खन्ना यांच्या प्रसिद्ध पोझ केल्या आहेत. रणबीरने त्याचे परिपूर्ण नृत्य कौशल्य दाखविले असून पल्लवीने त्याला चांगली साथ दिली आहे. ‘बेशरम’मध्ये ऋषी आणि नीतू कपूर यांनी पोलिसाच्या भूमिका साकारल्या असून जावेद जफ्री या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकते दिसेल. अभिनव कश्यप दिग्दर्शित ‘बेशरम’ २ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader