बॉलीवूडच्या एवरग्रीन अभिनेत्री रेखा या पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येत आहेत. इंदर कुमार दिग्दर्शित सुपरनानी या चित्रपटातून त्या पुनरागमन करत आहेत. या चित्रपटात जरी त्या आजीच्या भूमिकेत असल्या तरी त्यांचा ग्लॅमरस अवतार यात पाहायला मिळणार आहे.
सुपरनानी हा एक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट आहे. रेखा यांच्याव्यतिरीक्त रणधीर कपूर, अनुपम खेर, शरमन जोशी, श्वेता कुमार यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट दिवाळीत २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader